मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा;पदवीधारकांना 10 हजार दरमहा मिळणार योजनेचे अटी व नियम जाणून घ्या..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा;पदवीधारकांना 10 हजार दरमहा मिळणार योजनेचे अटी व नियम जाणून घ्या..!

आधुनिक केसरी न्यूज 

पंढरपूर : आज 17 जुलै मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे  यांनी लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा केली. 'लाडकी बहीण योजने’नंतर राज्यात लाडक्या भावांनाही लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी भावांसाठीही योजनेची घोषणा केली. यामध्ये 12 वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत.

हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अॅप्रेटिशीप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार, कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती समोर आली आहे. या लेखात योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत  प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान वय असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.नवीन वापरकर्ते नोंदणी पर्यायावर क्लिक करा.यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.



Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. ९ सप्टेंबर २०२६ भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने...
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप 
मेंढरांच्या तळावर बिबट्याचा हल्ला १ शेळी ठार
नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर