फुले कॉलनीच्या नागरिकांनी आमदार जैस्वाल यांच्या पुढे मांडल्या समस्या

दोन दिवसात कामे मार्गी लावण्याचा दिला शब्द

फुले कॉलनीच्या नागरिकांनी आमदार जैस्वाल यांच्या पुढे मांडल्या समस्या

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : येथील महात्मा फुले कॉलनी, गोगाबाबा टेकडीलगत,वामनदादा कर्डक सभागृह जवळील रहिवासी यांनी मूलभूत समस्या सोडविण्यासाठी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रदीप जैस्वाल यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.मागील वीस वर्षापासून महात्मा फुले कॉलनी येथे कुठल्याही सोयी सुविधा नसून फार मोठ्या प्रमाणात समस्या आहेत,यामुळे आमचे प्रचंड हाल होत आहेत,

आमच्याकडे लहान मुले, वयोवृद्ध व आजारी नागरिक असल्यामुळे, आम्हाला रस्ता नाही,शहरात जाण्यासाठी प्रचंड अडचणी होत आहेत, तसेच चिखलतून वाट काढावी लागत असून, रस्त्यात मोठे खड्डे आहेत, ड्रेनेजचे पाणी रस्त्यात येऊन घरात येते, त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत, आजार वाढत आहेत, रात्री-अपरात्री आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे, तसेच पिण्याचे पाणी नसल्याने आमची फार  अडचण होत आहे,अशा प्रकारच्या विविध समस्या मांडल्या.

 लवकरात लवकर ड्रेनेज लाईन टाकावी,तात्काळ अंतर्गत पक्के रस्ते बनवावे व पाण्याची पाईपलाईन टाकावी व नळाची जोडणी करून पाण्याची समस्या सोडवावी, सर्व मागण्या ऐकून येत्या दोन दिवसात आमदार जैस्वाल यांनी पूर्ण करण्याचा शब्द देऊन मी स्वतः भेट देणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सुरेश जगताप, डॉ. मिलिंद आठवले, ऍड. गौतम कदम, रवींद्र वानखेडे, लता थोरात,प्रभाकर भवरे,नीलिमा पवार,त्रिभुवन काका, शोभा शेजवळ, हन्ना खंडागळे,महानंदा साळवे,डॉ.रामेश्वर वरशीळ तसेच ,चाबुकस्वार काका, डोंगरे मावशी व चतुराबाई सरकटे यांची यावेळी उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 25 कोटी रुपयांच्या निधीला मिळाली मंजुरी आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 25 कोटी रुपयांच्या निधीला मिळाली मंजुरी
आधुनिक केसरी न्यूज भद्रावती वरोडा : विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण तडफदार आमदार करण देवतळे यांच्या विशेष प्रयत्नातून...
गिरड तालुका भडगाव शिवारात बिबट्या तळ ठोकून बिबट्याची  पिले आढळली गिरड सह परिसरात भीतीचे वातावरण
सोलापूर किडनी रॅकेट प्रकरण! किडनी तस्करी मधून सुंचूने साेलापुरात खरेदी केल्यात मोक्याच्या ठिकाणी  ५५  एकर जागा
नव्या वर्षाच्या स्वागता करीता श्रींच्या भाविकांसाठी आनंदाची पर्वणी, ३१डिसेंबरला श्रींचे मंदिर रात्रभर उघडे राहणार
नांदेड हादरले : एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडिलांचा गळफास; दोन मुलांनी रेल्वेखाली देत संपवले जीवन
ब्रह्मपुरी - नागभीड मार्गावर ‘बर्निंग टँकर’चा थरार
मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीची आत्महत्या