मोठी बातमी : हे सरकार फसवत आहे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सरकारवर टीका

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. 

आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, माझ्या अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात मी राज्यात मालमत्ता निर्मिती (Asset creation) होत नसल्याबद्दल राज्याचे लक्ष वेधले होते. नेमकी तीच बाब देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’ च्या अहवालात मांडली गेली आहे. या भाषणात मी असेही नमूद केले होते की राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अगदी तेच निरीक्षण महालेखापरीक्षकांनी नोंदवले असून ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली आहे असे त्यांनी सांगितले. 

आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकार वाटत असलेली अनावश्यक अनुदाने कमी करावीत, मालमत्ता निर्मितीकडे लक्ष पुरवावे, वाढीव पुरवणी मागण्या सादर करताना करताना त्याचे समर्थन करता यावे आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खर्च करण्याची पध्दत थांबवावी, अशा कडक शब्दांत कॅगने शिंदे -फडणवीस- पवार सरकारला सुनावले आहे असेही त्यांनी सांगितले. 

पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुकुन टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन आहे अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

करंजी रोड येथे बालकामगाराची सुटका बालकाला कामावर ठेवणे भोवले : मालकावर गुन्हा दाखल करंजी रोड येथे बालकामगाराची सुटका बालकाला कामावर ठेवणे भोवले : मालकावर गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज पांढरकवडा : ( राजीव आगरकर )मौजा करंजीतील समीर ऑटोमोबाईल अॅण्ड सर्व्हिसिंग सेंटर येथे अल्पवयीन मुलाला मोटरसायकल दुरुस्तीच्या...
पुण्यातील कोट्यवधींच्या धाडसी घरफोडी नंतर मोहिदेपूर येथील सहा तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात..!
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन
नळदुर्ग जवळ भीषण अपघात: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर पलटी होऊन, 5 जण जागीच ठार
बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत
तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट
लोणी यात्रेवर राहणार सीसीटीव्हीची करडी नजर