आता बोला ! पोलीस पाटलाच्या घरावरच चोरांचा डल्ला... एक लाख रुपये लांबविले...
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : कोपरगाव शहारालगत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकाण यांच्या घरात चोराने प्रवेश करून पॅन्ट च्या खिशातील साठ हजार व लाकडी कपाटावर ठेवलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला. या बाबतीत अधिक असे की जेऊर पाटोदाचे पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री तीन साडेतीन च्या सुमारास प्राथविधी करिता घराबाहेर असलेल्या शौचालयात गेले जाताना त्यांनी घराला कुलूप किंवा कडी न लावता गेले व तेथून पुन्हा घरात येऊन अंघोळीकरिता घरातील बाथरूमात गेले मात्र त्यावेळेस ही त्यांनी घराचे दार लोटून घेतले मात्र आतून कडी किंवा कुलूप लावले नाही याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन पॅन्टच्या खिशात असलेले साठ हजार व लाकडी कपाटावर असलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला. पोलीस पाटील हरिभाऊ केकाण हे अंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेली पॅन्ट दिसून न आल्याने त्यांनी त्यांनी लाकडी कपाटावर असलेले पैसे घेण्याकरिता घेले असता त्यांना तेथीही पैसे दिसून न आल्याने त्यांनी पॅंटीचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचे दिसले त्यांनी आपल्याघराबाहेर असलेल्या सिसिटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस स्टेशनाला कळविले असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, व पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पुढील तपास सुरु केला. यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकाण यांनी दिली.
Comment List