भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत दिली  'ही' माहिती

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली. 

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च
आधुनिक केसरी न्यूज राजरत्न भोजने खामगाव : भिमजयंती निमित्त ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये  कायदा व सुव्यवस्था अबाधित...
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उन्हाची दाहकता ...। नाथांच्या समाधीला व  पांडूरंगाला चंदन - उटीचा लेप 
इंटॅकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सिंह ठाकूर यांचा सत्कार
चंद्रपुरात चैत्र पौर्णिमेनिमित्त ५१ फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण
मग्रूर अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही कामामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिना निमित्त  रविवारी कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा..!