मॅजिकतर्फे स्टार्टअप, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी 'बीज' उपक्रमाला सुरवात

40 तासाच्या कोर्समध्ये स्टार्टअप्सना मिळणार व्यवसायाचे बारकावे

मॅजिकतर्फे स्टार्टअप, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी 'बीज' उपक्रमाला सुरवात

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : व्यवसायाचे बारकावे समजावून सांगण्याच्या उद्देशाने मराठवाडा एक्सीलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (MAGIC) ने आपल्या बिझनेस एंटरप्राइझ एज्युकेशनल जर्नी (बीज -BEEJ) कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे. स्टार्टअप, कार्यरत व्यावसायिक आणि उद्योजकतेच्या जगात प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला हा कोर्स सहभागींना स्पर्धात्मक व्यवसायामध्ये भरभराट करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करणार आहे. 15 जून 2024 रोजी या उपक्रमाची सुरवात झाली असून, बीज उपक्रम मॅजिकशी संलग्न अनुभवी तज्ञ आणि मार्गदर्शकांनी तयार केलेला सर्वसमावेशक शिक्षण अनुभव प्रदान करेल. 

या उपक्रमाबद्दल माहिती देतांना मॅजिकचे संचालक प्रसाद कोकीळ म्हणाले की आपला व्यवसाय सुरू करू इछिनार्‍या स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि उद्योजक यांना ४० तासाच्या या उपक्रमामध्ये व्यवसायाचे सर्व बारकाव्याचे मार्गदर्शन येणार आहे. 

कोर्सची वैशिष्ट्ये

कंपनीची नोंदणी आणि स्टार्टअप नोंदणी प्रक्रिया, स्टार्ट-अप आवश्यकता आणि प्रमाणीकरण, विक्री आणि विपणन, प्राईस आणि व्हॅल्यू अधोरेखित करणे, वार्षिक व्यवसाय योजना, व्यवसाय योजना सादरीकरण, वेळेचे मॅनेजमेंट, मीटिंगला कसे सामोरे जावे, व्यवसायातील वचनबद्धता, बिझनेस सायकल, आणि व्यवसाय शाश्वत कसा राहावा याचे बारकावे शिकवले जाणार असल्याचे, प्रसाद कोकीळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन केतकी तुपे यांनी केले. या उपक्रमामध्ये राज्यातील पुणे, राहुरी, जळगाव, मुक्ताईनगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथील स्टार्टअप्सनी सहभाग घेतला.

या उपक्रमाचे उदघाटन सीएमआयए संस्थेचे अध्यक्ष दुष्यंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  यावेळी बोलतांना ते म्हणाले की, व्यवसायाच्या सुरवातीच्या टप्यात स्टार्टअप्सना मेंटोरिंगची सर्वात जास्त गरज असते. मॅजिक संस्था या करिता मोठी भूमिका निभावत आहे, त्यांच्या या प्रयत्नांमुळे मराठवाडा विभागात स्टार्टअप इकोसिस्टिम मजबूत होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
आधुनिक केसरी न्यूज     छत्रपती संभाजीनगर : नोंदणीकृत नसलेल्या वर्तमानपत्राचा संपादक हा पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत फिर्याद देऊ शकतो का ? यामुद्द्यावर...
जळगाव जामोदच्या बस स्थानकामधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता..!
शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..! 
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी
देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी