काँग्रेसने घेतला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 'हा' मोठा निर्णय 

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. यातील कोकण पदवीधर मतदारंघातून महाविकास आघाडीचे रमेश कीर हे उमेदवार आहे. कोकण विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने एक समन्वय समिती गठीत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने गठीत करण्यात आलेल्या या समितीच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती करण्यात आली असून उद्या दिनांक १५ जून रोजी काँग्रेस मुख्यालय टिळकभवन येथे या समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या समितीत राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे हे नवी मुंबईचे समन्वय आहेत तर सहसमन्वयक निखील कविश्वर आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक माजी मंत्री सतेज बंटी पाटील तर सहसमन्वयक शशांक बावचकर आहेत. ठाणे शहर , ग्रामीण व कल्याण शहरसाठी माजी मंत्री विश्वजित कदम हे समन्वयक तर राजेंद्र शेलार सहसमन्वयक आहेत. भिवंडी उल्हासनगरसाठी माजी खासदार हुसेन दलवाई हे समन्वयक तर प्रदीप राव हे सहसमन्वयक आहेत. पालघर, वसई विरार, मीरा भाईंदर साठी माजी आमदार मुझफ्फर हुसेन समन्वयक तर सुरेश दळवी हे सहसमन्वयक आहेत. रायगड व पनवेल शहर साठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड समन्वयक तर संजय बालगुडे सहसमन्वयक आहेत आणि शहापुरसाठी माजी खासदार सुरेश टावरे समन्वयक तर सहसमन्वयक आकाश छाजेड आहेत. प्रदेश समन्वयकपदी सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश कंट्रोल रुम प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम तर प्रदेश कंट्रोल रुम सदस्यपदी गजानन देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना बहुमताने विजयी करण्यासाठी ही समिती जिल्हा व ब्लॉक स्तरावर बैठका घेऊन निवडणुकीसाठी काम करेल. तसेच काँग्रेस पक्षाबरोबरच मविआतील घटक पक्षांबरोबरही बैठक घेऊन कोकण विभागात विजयाची पताका फडकवण्यासाठी प्रयत्न करेल.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..! महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या...
वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले