प्री पेड स्मार्ट मिटर विरोधात जनआंदोलनाला समर्थन देण्याचे भाकपचे आवाहन !
आधुनिक केसरी न्यूज
छञपती संभाजीनगर : अगोदरच प्रचंड महागाई वाढवुन सर्वसामान्यांना मरणाच्या दारात आणुन उभा करणार्या केद्र व राज्य सरकारने प्री पेड स्मार्ट मीटर द्वारे दरोडा टाकण्याची योजना आणली आहे असा आरोप करुन भाकपने जनआंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे. याबाबत असे की, गॅस, डीझेल, पेट्रोल, तेल, डाळी, दुध इत्यादी महाग करुन सर्वसामांन्यांची लुट करणार्या मोदी- शिंदे- फडणवीस - अजित पवार सरकारने आता कधीही , कीतीही वीज दर वाढवण्यासाठी अदाणी व इतरांना कंञाट देऊन प्री पेड स्मार्ट मीटर लावुन सर्वसामान्यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे.
या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे.वास्तविकहे मीटर्स मोफत लावले जाणारनाहीत. वीजदरवाढीच्या रुपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच 12000/- रुपये वीज बीलात लावुन हप्त्याने वसूल केले जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे.
त्यामुळेकेवळखाजगीकंपन्यांच्याहितासाठीआणि.खाजगीकरणाच्यावाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही दरोडा योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसुन
येत आहे. वीज कायदा २००३ मधील अधिनियम क्रमांक
४७(५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क
संबंधित ग्राहकांना आहेत. अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या
हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे
संपूर्ण उल्लंघन अदानी आणि इतरांना चरण्यासाठी मोकळ रान करत आहेत.ज्याप्रमाणे मोबाईल प्री पेड चे दर कंपनी मालक व टोल कंपनी फास्ट टॅग सक्तीचे करुन परस्पर वाढवते त्याच प्रमाणे आणि ग्राहक काहीच करु शकत अशीच लुट वीज बीला मार्फत केली जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचात देखील जाता येणार नाही, औरंगाबाद साठी हैद्राबादच्या कंपनीला कंञाट दिल्याने हैद्राबादला जाऊन केस करावी लागेल अशी ही माहीती मिळत आहे. सरकार अशा प्रकारचे षडयंञ करीत असतांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. ग्राहक हक्कानुसार सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत आहे. पहील्या टप्प्यात जनसमर्थन मोहीम करुन प्रीपेड स्मार्ट
मीटर्सना विरोध केला जाणार आहे. 9823980665 या मोबाईलवर संदेश पाठवुन या जनआंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन भाकपचे शहर सचिव अॅड काॅ अभय टाकसाळ, सहसचिव काॅ जॅक्सन फर्णांडीस, काॅ अनिता हिवराळे, काॅ रफीक बक्श, काॅ. माया भिवसने, काॅ प्रकाश बनसोड, काॅ. जफर फजलु रहमान, काॅ विकास गायकवाड, काॅ मनिषा भोळे, काॅ. नीता कीर्तीशाही, काॅ सुरेश ठोंबरे, काॅ सुभाष साबळे यांच्यासह अनेकांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List