अन् जिल्हाधिकारी अचानक गेले थेट बियाण्यांच्या दुकानात

अन् जिल्हाधिकारी अचानक गेले थेट बियाण्यांच्या दुकानात

आधुनिक केसरी न्यूज 

 छत्रपती संभाजीनगर : बियाणे विक्रेत्यांकडे आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. बियाणे विक्रेत्यांचे गोडावून, दुकाने तसेच त्यांच्याकडील विविध नोंदींची तपासणी केली. बियाणे खरेदीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. 
    आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास जाधववाडी, नवा मोंढा भागात विविध कृषी सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी भेटी देवून बियाणे, रासायनीक खते यांच्या उपलब्धतेबाबत विक्रेत्यांकडील साठा नोंदवह्या तपासुन खातरजमा केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख त्यांच्या समवेत होते. बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणे, बियाणे,खते उपलब्ध असताना न देणे, साठेबाजी करणे याबाबत चौकशी केली. खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्याव्या अशी सुचनाही त्यांनी केली.
०००००

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
आधुनिक केसरी न्यूज  रोहित दळवी  पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे  यांनी वारकरी सांप्रदायातील...
एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 
जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना
ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त 
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!
लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा