वाघाचे हल्ले सुरूच ; चंद्रपूर जिल्ह्यात आणखीन एक जण वाघाची शिकार
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला.ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारे उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे (३३) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे.
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतकरी शेतात गुरेढोरे बांधून त्याच्या रखवालीसाठी जात होता. त्याचे शेत चिमूर-वरोरा या राज्य महामार्गाला लागून आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
24 Jan 2026 12:59:05
आधुनिक केसरी न्यूज जळगाव जा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पंचायत समितीला लागून असलेल्या मुख्य नाल्यात गेल्या अनेक...

Comment List