खंडाळा ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार अखेर उघडकीस  ; सरपंच श्रीमती कौशाबाई थोरात अपात्र 

आधुनिक केसरी न्यूज 

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली खंडाळा ग्रामपंचायत चा नुकताच भोंगळ कारभार उघडकीस झाला असून यात खंडाळा येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच श्रीमती कौशाबाई थोरात यांना छत्रपती संभाजीनगर चे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी सरपंच पदावरून काढून टाकत उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले आहे.

सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र गाडेकर यांनी खंडाळा ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,1958 चे कलम 39(1) अन्वये कारवाई साठी 2023 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात सरपंच कौशाबाई थोरात यांनी अधिकार नसताना त्यांच्या सरपंच कालावधीत खोटे वारस प्रमाणपत्र दिले असून त्यांची धारणा संशयास्पद असल्याचे म्हटले होते.
सदरील प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा अंतर्गत दोषी आढळून आल्याने त्यांना सरपंच पदावरून उर्वरित कालावधी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

या अपात्र आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी प्रतिवादी कौशाबाई चांगदेव थोरात, सरपंच, ग्रामपंचयत खंडाळा वैजापूर यांच्या विरोधातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर यांच्या चौकशी अहवाला आधारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,१९५८ चे कलम ३९(1) अन्यये कार्यवाही करणे बाबतचा दाखल केलेला प्रस्ताव जा.क्र. जिप औ /३ पंचायत/कावि -900/3034/2023, दिनांक 27/07/2023, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपत्ती संभाजीनगर यांची धारणा खोटी व संशयास्पद असल्याने अमान्य करण्यात आल्याचे म्हटले असून 

तसेच प्रतिवादी श्रीमती कौशाबाई चांगदेव थोरात,सरपंच,ग्रामपंचायत खंडाळा,ता.वैजापूर,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे सरपंच पदाचे कालावधीत केलेली नियमबाह्य कृती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९(1)  मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कृतीबद्दल दोषी आढळून आाले असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत खंडाळा,ता.वैजापूर,जि. छत्रपती संभाजीनगर येथील सरपंच पदावरून सांप्रत ग्रामपंचायतच्या उर्वरीत कालावधीसाठी अपात्र घोषीत करीत आहे.

तसेच सर्व संबंधिताना सदरील आदेशाची प्रत कळवून प्रकरण या न्यायालयात बंद करण्यात आली असून ही संचिका अभिलेख कक्षात वर्ग करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

सरपंच यांना अधिकार नसताना  बनावट वारस प्रमाणपत्र बनवून दिले तथा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीत सरपंच यांनी तोंडी म्हणणे मांडत माझी स्वाक्षरी त्या वारस प्रमाणपत्र नसून ती दुसरी कोणी केल्याचे म्हटले तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी मी तेव्हा खंडाळा ग्रामपंचायत येथे कार्यरत नव्हतो असे म्हटले असून इतर सरपंच स्वाक्षरी चे काही पुरावे सादर केले यावरून स्वाक्षरी एकच असल्याचे लक्ष्यात आले म्हणून अन भविष्यात चुकीच्या कामात तसेच बेकायदेशीर पद्धतीने काम होऊ नये म्हणून श्रीमती कौशाबाई थोरात यांना उर्वरित ग्रामपंचायत कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे जर सरपंच यांनी स्वाक्षरी केली नसेल तर स्वाक्षरी कोणाची याचा ही तपास होऊन कारवाई होणे गरजेचे आहे  तसेच असाच काही प्रकार अजून झालेला तर नाही ना अशी खंडाळा पंचक्रोशीत चर्चा बघावायस मिळत आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर :  गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय...
गडचिरोली जिल्ह्यात पुरांचा पाऊस , पुरामुळे तब्बल 50 मार्ग बंद! जीवनाआवश्यक वस्तूचा तुटवडा
मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर
माणुसकीला काळीमा साईनाथ रुग्णालयात आढळले जन्मलेल मृत अर्भक, वाचून थक्क व्हाल
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन...
तत्काळ अजित पवार पुण्याकडे रवाना
बेंबाळचे उदाहरण ताजे असतानाच वीज महावितरण विभागाने विसापूर येथील पाणीपुरवठा विभागाची कापली वीज