आजचे राशीभविष्य:  आज  काहींची आर्थिक कामे मार्गी लागतील...  पहा कोणत्या आहेत 'त्या' राशी..

आजचे राशीभविष्य:  आज  काहींची आर्थिक कामे मार्गी लागतील...  पहा कोणत्या आहेत 'त्या' राशी..

आधुनिक केसरी न्यूज

 जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....

मेष : शुभ रंगः क्रिम शुभ अंक : ८

आज घराबाहेर वावरताना रागिट स्वभावावर नियंत्रण असुद्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

वृषभ : शुभ रंगःहिरवा, शुभ अंक : ५

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकही प्रभावीत होतील.

मिथुन : शुभ रंगःतांबडा, शुभ अंक : ४

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.

कर्क : शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : ८

असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

सिंह : शुभ रंगःस्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७

आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस अाहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोड तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला.
कन्या : शुभ रंगःनिळा, शुभ अंक : ६

भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणेच आज योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करु नका.

तूळ : शुभ रंगः राखाडी, शुभ अंक : ५

सहज काही मिळाले नाही तरी आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्यांना दुखाऊ नका.

वृश्चिक : शुभ रंगः पांढरा, शुभ अंक : ९

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको, नाकासमोर चाला.

धनु : शुभ रंगःमोरपंखी, शुभ अंक : २

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदारास अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

मकर : शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येत थोडी नरम असेल.
कुंभ : शुभ रंगःजांभळा, शुभ अंक : ३

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकारांना विविध संधी चालून येतील.

मीन : शुभ रंगःगुलाबी, शुभ अंक : १

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे "विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे
आधुनिक केसरी न्यूज गोंडवाना : विद्यापीठाचा एक वेगळा नव उपक्रम "विद्यापीठ आपल्या गावात" मा.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या प्रेरणेतून भौगोलिक,...
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
ब्रेकिंग... नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर उद्या मेगा 15 जून ब्लॉक
बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले
अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द
चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक..!