आजचे राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील तुमचा रविवार.. जाणून घ्या...
आधुनिक केसरी न्यूज
जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....
मेष : शुभरंग: राखाडी, शुभ अंक : 7
आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल.आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.मृदु वाणीने धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील.
वृषभ : शुभरंग : पिस्ता, शुभ अंक : 8
समोरची व्यक्ती तुमच्या उणीवा शोधायचा प्रयत्न करेल. आज देण्या घेण्याच्या व्यवहारात सतर्क रहायला हवे.महत्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या
मिथुन : शुभरंग:मोतिया, शुभ अंक : 1
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. एखादी वस्तू गहाळ होईल सतर्क रहा. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. .दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित प्रवास घडण्याची शक्यता आहे.
कर्क : शुभरंग: लाल, शुभ अंक : 4
तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.नोकरदारांवर वरीष्ठांचा वरदहस्त राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. आज एखादा विवाह जुळवण्यात मध्यस्ती करू शकाल.
.
सिंह : शुभरंग: डाळिंबी, शुभ अंक : 9
आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्यउत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध रहा. अचानक धनप्राप्ती.धन लाभ संभावतो
कन्या : शुभरंग:हिरवा, शुभ अंक : 5
गुड न्युज मिळण्याची शक्यता आहे..आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृध्दीच्या संधी चालून येतील. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल आजच्या प्रवासात काही नवी नाती जुळून येतील.
तूळ : शुभरंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : 2
कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देईल. स्वत:चे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल
वृश्चिक : शुभरंग: पांढरा, शुभ अंक : 3
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्याआजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल
धनु : शुभरंग:जांभळा, शुभ अंक : 5
आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील. भागिदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. जुनी दुखणी आंगावर काढू नका. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.
मकर : शुभरंग:
भगवा, शुभ अंक : 4
पतीपत्नीं मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. . आज आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असतील.व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल.
.
कुंभ : शुभरंग: गुलाबी, शुभ अंक : 6
अधिकार योग 'चालून येतील. मोह टाळा, संयम ठेवा.. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या.. आर्थिक समस्यांवर मात कारलं. धन लाभ होण्याची दाट संभावतो.
मीन : शुभरंग: अकाशी, शुभ अंक : 9
आज झटपट लाभाचा मोह टाळा,नोकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईलनोकरीत वरीष्ठांची शाब्बासकी मिळवाल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List