राजकीय कविता : कुणी फुकावी तुतारी...
आधुनिक केसरी
संजय जेवरीकर ,पत्रकार
कुणी फुंकावी तुतारी
कुणी घड्याळ बघावे..
कुणी घ्यावे मशाल हाती
कुणी धनुष्य बाण ताणावे..
कुणी मुतावे धरणात
कुणी धरण गिळावे..
कुणी सत्तेसाठी आपले
इमान गिरवी ठेवावे...
कुणी काकासाठी झुरले
कुणी पुतण्याला बाजू केले..
सत्तेसाठी ज्यांनी त्यांनी
आपले प्यादे सरकावले..
कुणी पोरीला पुढे केले
कुणी पोरगा डावी लावला..
कुणी घराणेशाहीसाठी
पक्ष डावावर लावला..
कुणी कमळ फुलवावे
कुणी हाती कमळ घ्यावे..
कुणी ईडीच्या भीतीने
स्वतःला गिरवी टाकावे..
महाराष्ट्री देशा आता
मतदार मूर्खात निघाले..
सत्तेसाठी सगळ्यांनी आपले
कमरेचे डोक्याला गुंडाळले...
कुणी तुतारी मिळताच
दर्शना रायगडी पोचले..
हाती घड्याळ असता
कुणी कमळ कुरवाळले..
बस करा आता तुम्ही
महाराष्ट्र डावावर लावणे..
हाकलून लाव सत्तेवरूनी
आता हे सगळे शहाणे..
ताठ मानेने उभी राहू दे
पुन्हा शान महाराष्ट्राची...
दाखव जागा महाभागांना
अन् ताकद मतदारांची....!
Comment List