24 फेब्रुवारी राशीभविष्य: आज  'या तीन' राशींच्या लोकांना आकस्मित धनलाभ संभावतो; पाहा या राशीत तुमची राशि आहे का?

24 फेब्रुवारी राशीभविष्य: आज  'या तीन' राशींच्या लोकांना आकस्मित धनलाभ संभावतो; पाहा या राशीत तुमची राशि आहे का?

आधुनिक केसरी न्यूज

आज  जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....

मेष : शुभरंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : 7

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. काहीजणांना अनपेक्षितपणे जवळ चे प्रवास घडणार आहेत.आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ : शुभरंग : केशरी, शुभ अंक : 9

प्रवासात त्रास होईल.आर्थिक आवक मनाजोगती राहील.  आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदुता ठेवतीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील

मिथुन : शुभरंग: पांढरा, शुभ अंक : 4

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते घेतील.

कर्क : शुभरंग: मरून, शुभ अंक : 3

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.
.

सिंह : शुभरंग: लाल, शुभ अंक : 5

नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.व्यस्त दिवस, उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल.आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. 

कन्या : शुभरंग:हिरवा, शुभ अंक : 6

वाणीत मात्र गोडवा असु द्या. तरूण मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील.कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील.काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील.

तूळ : शुभरंग: सोनेरी, शुभ अंक : 8

झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.  कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा.


वृश्चिक : शुभरंग: राखाडी, शुभ अंक : 7

एखाद्या महत्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरवात होईल.  कौटुंबिक गरजा वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल पण तुम्ही निभाऊन न्याल.

धनु : शुभरंग: पिस्ता, शुभ अंक : 4

आज गृहीणी घर स्वच्छेचे मनावरच घेतील. आज स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील.

मकर : शुभरंग: मरून, शुभ अंक : 3

सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. म्हणाल ती पूर्व असेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे.

कुंभ : शुभरंग: क्रिम, शुभ अंक : 9

आज सज्जनांच्या सहवासात वैचारीक देवाण घेवाण होईल.  तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.

मीन : शुभरंग: जांभळा, शुभ अंक : 2

अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.कौटुंबिक जिवनांत सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप