कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकार अॅक्शन मोडवर,राज्यात अखेर 'टास्क फोर्स'ची स्थापना; वाचा सविस्तर

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकार अॅक्शन मोडवर,राज्यात अखेर 'टास्क फोर्स'ची स्थापना; वाचा सविस्तर

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई :  कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. ही पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देशासह राज्यात  मोठी वाढ होत आहे. राज्यात अखेर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता  अॅक्शन मोडवर आले आहे.

सरकारच्या या टास्क फोर्समध्ये कोण असणार?

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
--------------------------------------------------------------------------

IMG-20231225-WA0002

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..! 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील 20 दिवसांच्या बाळाचा  खून जन्मदात्या मातेनेच केल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने...
दहा फुटाच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान 
मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग 
जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित 
वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी देवानंद दामोदर‌
लाडसावंगी बाजारपेठेला येणार चांगले दिवस : हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस