"हनिमून": शब्दाची उत्पत्ती आणि बरेच काही, वाचा सविस्तर

आधुनिक केसरी न्यूज 

"मीड" नावाच्या ड्रिंकपासून याची सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये सुरुवातीच्या काळात लग्नाच्या वेळी जोडप्याला एक पेय दिलं जात असे. ज्यात मुख्यतः भरपूर प्रमाणात मध (हनी) पाणी आणि काही मसाले (स्पायसेस) यांचं मिश्रण केलेलं असे. यामध्ये उत्साहवर्धक आणि जननशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश केलेला असे. हे पेय लग्न झाल्यापासून दररोज रात्री पौर्णिमेपर्यंत म्हणजेच चंद्राचे पूर्ण दर्शन होऊपर्यंत दिले जात असे. म्हणून याला हनी म्हणजे मध आणि मून म्हणजे चंद्र, पौर्णिमा असं म्हटलं गेलं. अशा पद्धतीने या हनिमून शब्दाची उत्पत्ती झालेली आहे.
⦿ हनिमूनचा हेतू काय ?
दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडसं बाजूला जाऊन या लग्नादरम्यान, सगळ्यांच्या गाठीभेटीतून थोडसं एकांत मिळण्यासाठी तयार करण्यात आलेली एक प्रथा म्हणजे हनिमून.
⦿ हे फक्त लग्नानंतर एकदाच करायचे असते का ?
खरं म्हणजे लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला हा हनिमून साजरा होणं आवश्यक आहे. म्हणजेच खरं हनी आणि खरा मून तयार होत राहील आणि तो आयुष्यभर टिकेल. जेव्हा हनीमधला गोडवा आणि मूनमधील चंद्रकलेत अंतर पडते त्या वेळी मग ग्रहण लागतं आणि तुमच्या आयुष्यातील सुखी जीवनाच्या मंत्राची गुरुकिल्ली काय हे शोधावं लागतं.
⦿ हनिमूनचे समानार्थी शब्द
१. आनंद मास, २. मधु मास, ३. सुहाग मास, ४. सुहाग रात, ५. प्रमोद काल, ६. मधुर चंद्र
⦿ हनिमूनला गेल्यानंतर काय कराल ?
१. एकमेकांना ओळखा, जवळीक वाढवा आता खर तर आजकाल हा प्रश्न येत नाही. कारण बऱ्याच वेळा लग्नाच्या आधी गाठीभेटी होत असतात. त्यात ओळख झालेली असतेच. मात्र जेव्हा तुम्ही हनिमूनला जाल तेव्हा तिथे गेल्यानंतर लगेचच सेक्सची घाई न करता पहिल्यांदा एकमेकांशी बोला, चर्चा करा. एकमेकांच्या आवडी-निवडी, छंद याबद्दल जाणून घ्या. जसं एकमेकांना आवडतं तसं राहण्याचा प्रयत्न करा. खाण्यापिण्याच्या आवडी जाणून तशा पद्धतीचे पदार्थ मागवा आणि अगदी प्रेमानं, आपुलकीने ते ग्रहण करा म्हणजे खा... म्हणजे थोडक्यात जवळीक वाढवा, स्नेह, आदर, आपुलकी, प्रेम हे सर्व आपोआप निर्माण होतं आणि मग हळूहळू दोघांतील अंतर कमी होऊन त्याच रूपांतर शरीर एक होण्यात होतं.
२. काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन करा. काही तरी वेगळं याचा अर्थ असा आहे की लग्नापर्यंतच्या आयुष्यात जे रुटीन लाईफ तुम्ही जगत आलात त्यापेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न करा. जे तुमच्यासाठी नवीन असेल. स्विमिंग करत नसाल तर ते करा, एकाच ताटात खाल्लं नसेल तर ते करून पाहा, एकच आईस्क्रीम दोघांत खाऊन पाहा, जे कपडे तुम्ही नेहमी परिधान करता त्यापेक्षा काही वेगळे ड्रेसेस घालून पाहा. सिनेमा, नाटक, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तर ते अटेंड करा. या सर्व गोष्टींमुळे तुमच्यातील अनोळखीपणा संपेल आणि तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल.
३. प्रसन्न वातावरण - ज्या हॉटेल रुममध्ये तुम्ही वास्तव्य केलं असेल त्या रुममधील वातावरण कसं आहे? तिथे तुम्हाला आवश्यक अशा सुखसोई आहेत का? तिथे आवश्यक अशी शांतता आणि एकांत आहे का? अंथरुणं तसेच पांघरुण स्वच्छ आणि पांढरीशुभ्र असावीत. त्यामुळे मन आणखी प्रसन्न आणि प्रफुल्लित होईल.
४. ईट अन्ड ड्रिंक एखाद्या दिवशी कॅण्डल लाईट डिनरचा प्लॅन करा - आवडीचे पदार्थ, ज्यूस, कॉकटेल असं मागवून ते अगदी शांतपणे, गप्पा मारत, एकमेकांना भरवत असं एंजॉय करा. निवांतपणे टी.व्ही., मोबाईल या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण वेळ एकमेकांना द्या. म्हणजे त्या कॅन्डल लाईट डिनरची मजा दोघांनाही घेता येईल.
५. वाद, भांडण टाळा. अनेक वेळा जर ती दोघं एकमेकांसाठी अनोळखी असतील तर स्वभाव नीट माहीत नसतात. सवयी हा प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा एक भाग असतो. त्या नीटशा माहीत झालेल्या नसतात. अशा वेळी एखादी न पटणारी बाब घडू शकते. त्या वेळी समोरच्या व्यक्तीसोबत वाद किंवा भांडण न करता तिला किंवा त्याला आपली भूमिका, आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करा. एकमेकांची मनं सांभाळा. आपल्या वागण्यामुळे समोरची व्यक्ती दुःखी होणार नाही, दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या.

--डॉ. विजय दहिफळे
युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट अँड सेक्सॉलॉजिस्ट 
9822326248

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित  अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित 
आधुनिक केसरी न्यूज घनसावंगी : तालुक्यात राबविण्यात आलेल्या अंगणवाडी भरती प्रकरणी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी काही महिलांकडून...
IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जन सुरक्षा विधेयक महत्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
ब्रह्मपुरी तालुक्यात 10 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
ट्रॅव्हल्स चे धडकेत पिकअप मधील माशांचा समृद्धीवर पाऊस
सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद