सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी;' जाणून घ्या आजचे दर  

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी;' जाणून घ्या आजचे दर  

 आधुनिक केसरी न्यूज

 मुंबई : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याने 58 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. रविवारपासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण या काळात सोन्या-चांदीची भरपूर खरेदी करतात. मात्र, त्यापूर्वीच सोन्या चांदीचे दर वाढले आहेत. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोन्याने 58 हजाराचा स्तर ओलांडला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोने 58,045 रुपयांवर होते. त्यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 वाजेपर्यंत कालच्या तुलनेत आज सोने 154 रुपये म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या सोन्याचा दर हा 58 हजार 94 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. काल काल वायदा बाजारात सोन्याचे दर हे 57 हजार 940 रुपये होते. 

सोन्याव्यतिरिक्त, चांदीच्या किंमतीतही आज वाढ झाली आहे. वायदा बाजारात चांदीचा दर आज 69,734 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होते. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून आली आहे. कालच्या तुलनेत चांदी 409 रुपयांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी महाग झाली आहे. आज चांदीचे दर हे 69 हजार 835 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. काल चांदी 69,325 रुपयांवर बंद झाली.

या 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे नवे दर
मुंबई -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, चेन्नई -  24 कॅरेट सोने 59,070 रुपये, चांदी 75,500 रुपये प्रति किलो, कोलकाता -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, दिल्ली - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, नोएडा -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 7,600 रुपये प्रति किलो, गाझियाबाद -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
जयपूर -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो, लखनौ -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, पाटणा -  24 कॅरेट सोने 58,960 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, 
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, पुणे -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, गोवा -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 71,000 रुपये प्रति किलो.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आरपीआय आंबेडकर पक्षाचे  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन  आरपीआय आंबेडकर पक्षाचे  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन 
आधुनिक केसरी न्यूज बुलढाणा : सविस्तर वृत्त असे की सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायालयीन कामकाज चालू असताना सहा ऑक्टोबर रोजी...
Breking News : एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट
एलएलबी परीक्षेस बसण्याची संधी द्या’ विद्यार्थ्यांचे विद्यापीठात आंदोलन
वाघाच्या डरकाळीने उडाली गोंदियाकरांची झोप
15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई, नाकाबंदीमध्ये फरार आरोपी पकडला, वैजापूर पोलिस स्टेशन येथे दरोड्याच्या गुन्ह्यात होता फरार
कटगुण गावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून