सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल

 सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल

 आधुनिक केसरी न्यूज 


मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी सुनावले आहे. ते  माध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचं काम केले आहे. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे.

महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केलं? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती,” असे टीकास्र रामदास आठवलेंनी सोडले.
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाण होईल, असे वाटत नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटले.
इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे ठिक नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी आजपासून  मंदिरात परिसरात मोबाईल वापर करण्यास बंदी
आधुनिक केसरी न्यूज  दिपक सुरोसे  शेगांव : श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि. बुलढाणा(पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल.) श्री...
विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 
जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना
ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त 
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!
लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक