माझ्या नादाला लागले की कार्यक्रम... मनोज जरांगे नाशिकमध्ये आक्रमक
आधुनिक केसरी न्यूज
नाश्ठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी आज नाशिकमध्ये जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांना मराठ्यांचा इतका द्वेष का? असा सवाल केला. मराठा आरक्षणाला विरोध करुन मराठ्यांच्या मुलांच्या ताटात विष कालवू नका, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
त्यांच्या भाषणावेळी श्रोते उन्हात उभे होते. त्यामुळे जरांगे पाटील देखील व्यासपीठावरुन उठून खाली आहे. त्यांनी उन्हात उभे राहून भाषण केले. मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला. “ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला त्याच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे, असे जरांगे यांनी यावेळी सांगितले.
आमच्यावर हल्ला का केला? याचे उत्तर अजूनही दिले नाही. ज्या माय माऊलीच्या अंगावर रक्त सांडले होते त्या माय माउलीने सांगितले आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचे नाही. विदर्भातील मराठे शेतकरी म्हणून त्यांना आरक्षण, तर आम्ही काय समुद्रात आहोत का? आम्ही पण शेती करतो”, असे मनोज जरांगे म्हणाले.
जी जात मागास सिद्ध झाली ती जात मराठा आहे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे. 40 दिवस देतो पण आरक्षण पाहिजेच, सगळे कामालाच लागली. माझ्या नादाला लागले की कार्यक्रम उलटा असतो, तुम्ही म्हणाले आरक्षणाला विरोध नाही म्हणून उपोषण सोडले, असे जरांगे म्हणाले. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आमची 60 टक्के लोकसंख्या, 60 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठे, 20 टक्के एससी, एसटी. 150 टक्के लोकसंख्या असते का? मंडल कमिशन ने दिलेले 14 टक्के घ्या, आमचे आरक्षण आम्हाला द्या, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
मी उल्टा औलादीचा नाही, ते पाहुणे आहेत का? भुजबळ साहेबांवर चार दिवस झाले मी बोलत नाही. त्यांनी आरक्षणाला विरोध केला नाही, असे म्हटले म्हणून नाव सुद्धा घेतले नाही. तुम्ही विरोध केला तर मग आपला दणका अवघड असतो. मग सुट्टी नाही. मी जाहीर सांगतो, ओबीसी नेते आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सांगतो. मी मराठ्यांचा द्वेष करत नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हणून लढायला तयार आहे, असे सांगा. तुमच्यात मराठ्यांच्या बद्दल द्वेष का भरलाय? हे सांगायला तयार नाही, असं जरांगे यावेळी म्हणाले.
मराठ्यांच्या मुलांच्या ताटात विष कालवू नका. मराठा नाव घेतले की ते लगेच विरोध करतात. ओबीसीत मराठा समाज आला तर कमी होईल. ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी एकत्र आहे. फक्त नेतेच विरोध करतात. त्यांचे आणि आपले पण धडाचे नाहीत. हे खोट बोलून ओबीसी बांधवांना वेड्यात काढत आहे. मराठा सगळा ओबीसी आरक्षणात गेले, फक्त आम्हीच राहिलो. दिले 14 टक्के, खातो 30 टक्के, किती खातो? असा सवाल जरांगे यांनी केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List