अभिमानास्पद! अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक, १९८२ नंतर घडला इतिहास

अभिमानास्पद! अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक, १९८२ नंतर घडला इतिहास

आधुनिक केसरी न्यूज
मुंबई:आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे याने  इतिहास रचला आहे. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने आज ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली अन् त्याने दुसऱ्या क्रमांकावर कूच केली. पण बाहरिनच्या फिकादू दावीतने मिळवलेली आघाडी तो कमी करू शकला नाही. त्याला रोप्यपदकावर समाधान मानावे लागले. १९८२ नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.
भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५० सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला. अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला. ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला.


भारतीय लष्करात ही आहे अविनाश...


१३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये, आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि. ७ बारामती राज्यमार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत रात्री साडेदाहा च्या सुमारास ऊस वाहतूक...
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले, संविधान विरोधी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
जळगाव जामोदच्या बस स्थानकामधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता..!
शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..!