Aditya-L1 Mission : इस्रोची ऐतिहासिक भरारी; आदित्य एल-१ सूर्याकडे झेपावले,वाचा सविस्तर...
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
श्रीहरिकोटा : चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर आता देशासह संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या सूर्य मोहिमेवर म्हणजेच आदित्य-एल-१ वर लागल्या आहेत.आदित्य एल-१ मिशन आज सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले.पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य एल -१ या अंतराळयानाला एल-१बिंदूवर घेऊन जाईल. इस्रो ची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल-१ श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ च्या ऐतिहासिक लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आता देशासह जगाच्या नजरा इस्रोच्या सूर्या मिशनवर म्हणजेच आदित्य-एल१ वर खिळल्या आहेत.पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ या अवकाशयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. लॉन्च झाल्यानंतर १२७ दिवसांनी ते त्याच्या पॉइंट L-१ वर पोहोचेल.या टप्प्यावर पोहोचल्यानंतर आदित्य-एल१ अतिशय महत्त्वाचा डेटा पाठवण्यास सुरुवात करेल.
आदित्य-एल-१ अवकाशात सोडणार आहे. हे रॉकेट आदित्य-एल1 पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडणार आहे. त्याची पेरीजी २३५ किमी आणि अपोजी १९५००, किमी असेल. पेरीजी म्हणजे पृथ्वीपासून सर्वात जवळचे अंतर आणि अपोजी म्हणजे कमाल अंतर. आदित्य-एल-१ चे वजन १४८०.७ किलो आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे ६३ मिनिटांनी आदित्य-एल१ अंतराळयान रॉकेटपासून वेगळे होईल.
Comment List