बीएसएनएलच्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्लेच्या ओटीटी सेवेची सुरुवात
पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी शुभारंभ
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : भारतीय दूरसंचार (बीएसएनएल) च्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्ले च्या ओटीटी सेवांचा शुभारंभ सुपर संगणक निर्माते पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनी झाला. भारतात पहिल्यांदा बीएसएनएल बरोबर एओन प्ले ने ओटीटी सेवांची सुरुवात केली असून मनोरंजन, शिक्षण, आरोग्य ई-कॉमर्स सेवा उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी देशातील डिजीटल, प्रिंट, दुरचित्रवाहिन्या एका क्लिकवर आणून रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेला मूर्त रुप आणल्याने डिजिटल सेवांमध्ये क्रांतिकारी पाऊल ठरले आहे.
भारतामधील डिजिटल सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारत सरकारच्या बीएसएनएल विभागाने व्हॅल्यू एडिट सेवेअंतर्गत एओन प्ले बरोबर ओटीटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुपर संगणक निर्मितीचे जनक पद्मश्री पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित डिजिटल संशोधक डॉ. अतुल नाईक यांनी सर्वसामान्य वापरकर्त्यांना उपयुक्त अशी प्रणाली विकसित केली असून एका क्लिकवर विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी देशभरातील डिजिटल, प्रिंट, दूरचित्रवाहिनी मिडिया एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यातून रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेला मूर्त रूप आणले आहे. लोकल टू ग्लोबल अंतर्गत गावातील सामान्य माणसालाही या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून जगाच्या पाठीवर पोहोचता येणार आहे. माहिती न्यूज मनोरंजन आरोग्य ई-कॉमर्स या विविध प्रकारच्या सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार पूर्ण भारतीय बनावटीचे एओन प्ले अॅप बीएसएनएलच्या कोट्यावधी युजरसाठी सहज उपलब्ध होणार आहे. बीएसएनएलच्या प्लॅटफॉर्मवर ओटीटी सेवांचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थित झाला यावेळी उद्योजक श्री मोहन बोरोले, डॉ. विजय नाईक, डॉ.भास्कर सानप यांच्यासह अनेक मान्यवर ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List