Video : फेब्रुवारीत होणार काशाबा कुस्ती स्पर्धा ; गरुड मैदान येथे पालकमंत्र्यांची पाहणी
आधुनिक केसरी न्यूज
आकाश सोनवणे
धुळे : कुस्ती मैदानासाठी सुशोभीकरण व नियोजनाची तयारी साठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलद शर्मा, पालिका आयुक्त, राजवर्धन कदमबांडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरुड मैदान येथे होणाऱ्या काशाबा कुस्ती स्पर्धा साठी कित्येक वेळ चर्चा रंगली या चर्चेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या उत्साहात या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे व येणाऱ्या कुस्ती स्पर्धांसाठी फेब्रुवारीच्या 11 तारखेपासून धुळ्यातील सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा राहील असे सांगण्यात आले या ठिकाणी उपस्थित पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे,जिल्हाधिकारी जलद शर्मा,सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पालिका आयुक्त देविदास टेकाळे, माजी महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर नागसेन बोरसे, नगरसेवक सुनील बैसाणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List