सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार

ग्रामविकासमंत्री तथा राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार यांची घोषणा

सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार

आधुनिक केसरी न्यूज
सोयगाव : नगर पंचायतीचे उत्पन्न वाढावे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
या व्यापार संकुलामध्ये शहरातील दिव्यांग तसेच महिलांसाठी काही दुकाने आरक्षित असतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के प्रमाणे प्रतिव्यक्ती 1 हजार 214 प्रमाणे 70 लाभार्त्यांना धनादेश तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत टप्पा 1 ते 4 मधील एकूण 68 लाभार्त्यांना घरकुल अनुदान धनादेशाचे वाटप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी डीपीआर 3 साठी नवीन घरकुल लाभार्त्यांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. सोमवार रोजी शहरातील जुना बाजार चौकात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष सुरेखाताई प्रभाकर काळे, शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे, शिवसेना गटनेता अक्षय काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव,मा.सभापती धरमसिंग चव्हाण नादातांडा, सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)घाणेगांव तांडा,सिल्लोड पं. स.सदस्य निजाम पठाण, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, एपीआय सुदाम सिरसाट, मुख्याधिकारी सय्यद रफिक, सिल्लोड चे नगरसेवक मनोज झंवर, सिल्लोड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, विशाल जाधव, सिल्लोड खरेदी – विक्री संघाचे चेअरमन साळवे, सुदाम सुडके यांच्यासह नगरसेवक हर्षल काळे, शाहिस्ताबी रउफ बागवान, दीपक पगारे, वर्षा राजेंद्र घणगाव, संध्याताई किशोर मापारी, कुसुम राजेंद्र दुतोंडे, संतोष बोडखे, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, ममताबाई विष्णू इंगळे, आशियाना कदिर शहा, लतीफ शहा , अशोक खेडकर, गजानन माळी तसेच मोतीराम पंडित, भगवान वारांगने, रमेश गावंडे, शरीफ शहा, विवेक महाजन, योगेश कळवत्रे आदींची उपस्थिती होती.सोयगाव शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई आवास , शबरी आवास व अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या घरकुल योजना प्राधान्याने राबवून शहरातील प्रत्येक बे घरांना घरकुल योजनेतून घरे देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सोयगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या 10 टक्के सहभाग निधीची उपलब्धता करून देवू, सोयगाव येथील जागेचा प्रश्न मार्गी लागताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. शहराला नियमित वीज पुरवठा व्हावा, शेंदूरणी रस्त्याचा कामाला सुरुवात करून गुगडी धरणात ईतर ठिकाणाहून पाणी सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी दिली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? ... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?
आधुनिक केसरी मुंबई  : राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी...
वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता
पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी १५ एकर भूसंपादनाचा शासननिर्णय
तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी
शेतकऱ्यांना सरकार घाबरले ;पोलिसांनी दंडुक्याच्या बळावर संवैधानिक आंदोलन चिरडले 
जय हो....बिल गेट्स यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल
उष्माघाताच्या लाटेपासून स्वत:चे संरक्षण करा : जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन