शब्द काय सांगतात?भाग (२०):याम
याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा.आ उपसर्ग लागून याचा ‘आयाम’ होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह.विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणतो.योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे ‘प्राणायाम.‘आयाम’ला वि उपसर्ग लागून ‘व्यायाम’ होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (२०):याम
याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा.
आ उपसर्ग लागून याचा ‘आयाम’ होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह.
विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणतो.
योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे ‘प्राणायाम.
‘आयाम’ला वि उपसर्ग लागून ‘व्यायाम’ होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून शरीराचा योग्य आकारात विस्तार करणे म्हणजे ‘व्यायाम’. व्यायाम म्हणजे उद्योग, श्रम असेही अर्थ आहेत.
याम या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे प्रहर. प्रहर म्हणजे तीन तासांचा काळ. चोवीस तासात आठ प्रहर असतात म्हणजेच आठ याम असतात.
संत गोरा कुंभार चोवीस तास विठ्ठलनामात दंग असत. म्हणून ते एका अभंगात लिहितात,
“नाम तुझे घेतो गोरा म्हणुनी आठ याम।
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम।।”
यामिनी, यामवती, यामिका म्हणजे रात्र. म्हणून पहारेकर्यासाठी ‘यामिक’ असाही शब्द आहे.
यम् हा धातू यामागे आहे. संयम, नियम, विनियमन अशा अनेक शब्दांचेही मूळ यम् हा धातू आहे.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List