शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप

शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप

ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट. आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो.(पश्चात् म्हणजेच ‘नंतर’. त्यामुळे ‘नंतर पश्चात्ताप झाला’ असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच. क्रोधाला ‘संताप’ म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर ‘सात्विक संताप’ म्हणतात.जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप


ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट. आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो.
(पश्चात् म्हणजेच ‘नंतर’. त्यामुळे ‘नंतर पश्चात्ताप झाला’ असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच. क्रोधाला ‘संताप’ म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर ‘सात्विक संताप’ म्हणतात.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. यांना त्रिविधताप म्हणतात.
अज्ञान, मूर्खपणा, राग, द्वेष, रोग यामुळे स्वतःला होतो तो आध्यात्मिक ताप.
शत्रु, प्राणी किंवा इतरांमुळे होतो तो आधिभौतिक ताप.
आणि दुष्काळ, भूकम्प, पूर वगैरेमुळे होतो तो आधिदैविक ताप.
पराक्रम गाजवला की त्याला ‘प्रताप’ म्हणतात. (काही उलटेसुलटे काम करून ठेवले की मराठीत उपरोधाने ‘प्रताप करून ठेवले’ असे म्हणतात.)
तापस म्हणजे तप करणारा तपस्वी. तप करणारी स्त्री असेल तर तिला ‘तापसी’ म्हणतात. हे एका अभिनेत्रीचेही नाव आहे. तापन किंवा तपन म्हणजे सूर्य. (तपन सिन्हा हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत.)
तापात ताप एखादे काम करताना कधी कधी डोक्याला ताप होतो ती गोष्ट वेगळी.
तापमान वाढलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.12 जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती...
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई