पाणीटंचाईच्या झळा: हिंगोलीत महिला आक्रमक
हिंगोली : शहरालगत असलेल्या सुराणा नगरात नियमित पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी थेट जिल्हा परिषदेचे सीईओ व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. या बाबत रंजना पाईकराव, ज्योती कापसे, रेखा कपाटे, सुषमा जाधव, आश्विनी घुगे, जयश्री वानखेडे, सुनिता माखणे, स्वाती लेकुळे, अंजली बुर्से आदींनी निवेदन दिले… Continue reading पाणीटंचाईच्या झळा: हिंगोलीत महिला आक्रमक
हिंगोली : शहरालगत असलेल्या सुराणा नगरात नियमित पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी थेट जिल्हा परिषदेचे सीईओ व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.
या बाबत रंजना पाईकराव, ज्योती कापसे, रेखा कपाटे, सुषमा जाधव, आश्विनी घुगे, जयश्री वानखेडे, सुनिता माखणे, स्वाती लेकुळे, अंजली बुर्से आदींनी निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, सुरानानगर व रघुनंदन नगर याठिकाणी रस्ते , नाल्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच नियमित पाणीपुरवठा होत नाही या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List