साडी सोडून केली झोळी…

साडी सोडून केली झोळी…

जळगाव :१६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते.

जळगाव :१६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती. आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले. यावेळी ३ किमी लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण  वाचला.

सदर घटनेत विमलबाई भिल यांनी प्रसंगावधान दाखवत मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी देवून हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी विमलबाई भिल यांच्यासोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरूणांचादेखील स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे. ११ ऑगस्टला विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात विमलबाई भिल यांना हा पुरस्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन राहणार आहेत.

Tags: award

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले  मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दिवसाढवळ्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन एका व्यापाऱ्याला चोरट्यांनी जबर मारहाण करुन...
“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त