झोपेच्या डुलकीचा फटका; समृद्धी महामार्गावर स्कार्पिओची आयशरला धडक
आधुनिक केसरी न्यूज
सिंदखेडराजा, दि. ७ जून : मुंबई कॉरिडोरवरील समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्रमांक ३३४.९ जवळ शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ आणि आयशर ट्रकमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून स्कार्पिओमधील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कार्पिओ (एमएच ४० केआर १९४९) हे वाहन नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे समोर जात असलेल्या आयशर ट्रक (टीएस ०८ युएच ८९४९) ला स्कार्पिओने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतरही ट्रक चालकाला अपघात झाल्याचे लक्षात न आल्याने त्याने वाहन पुढे चालवत नेले. परिणामी अपघातग्रस्त स्कार्पिओ सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ट्रकसोबत फरफटत गेल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात स्कार्पिओ चालक संकेत जगनाळे यांच्यासह संदीप जगनाळे, संगीता जगनाळे, रूपाली जगनाळे, मानस थोटे व वैशू थोटे हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदखेडराजा येथे दाखल करण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. समृद्धी महामार्ग प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोलनाका परिसरात हलविण्यात आली. दरम्यान, पहाटेच्या वेळी चालकाला आलेल्या झोपेच्या डुलकीमुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.हे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List