डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद
श्यामनगर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या कार्यालयासमोर आंदोलन
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : येथील आसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपर फुटी प्रकरणात डॉ अटक होताच नांदेड शहरात खळबळ माजली असून अनेक कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन क्लासेस बंद केले आहेत . डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या शहरातील तिन्ही कोचिंग क्लासेस बंद करण्यात आली असून अनेक खाजगी क्लासेस अघोषित बंद ठेवण्यात आली आहेत. डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या श्यामनगर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत असल्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
नीट पेपर फुट प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे वृत्त नांदेड येथे धडकताच खाजगी कोचिंग क्लासेस घेणारे संचालक व त्यांच्या सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नांदेड शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेस व इतर खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी आपल्या कार्यालयांना कुलूप लावून विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे. तसेच डॉ शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याचे वृत्त धडकताच अनेक खाजगी क्लासेस चालविणाऱ्या संचालकांनी आपल्या क्लासेसला सुट्टी घोषित केली आहे. दररोज खाजगी क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रस्ते गजबजलेले असतात त्या भाग्यनगर, आनंदनगर, श्यामनगर, श्रीनगर, विसावा गार्डन परिसरातील रस्ते सुनसान झाले आहेत. त्यामुळे या भागातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याचे चित्र आहे. नांदेड शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांनी डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून नीट पेपर फुटीचे सुत्रधार डॉ शिवराज मोटेगावकर यांचा निषेध करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खिलवाड करणार्यांना डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन छेडण्यात येत आहेत. नांदेड शहरात एस एफ आय विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढून राग व्यक्त केला आहे. श्यामनगर येथील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. नांदेड शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी आपली कार्यालये बंद केली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी व कर्मचारी यांना सुट्टी दिली आहे.
मोटेगावकर यांचे क्लासेस बंद
आर सी सी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याचे वृत्त नांदेड येथे धडकताच आर सी सी कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात खळबळ उडाली आहे. कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी दिली असून सर्व मंडळी अंडरग्राऊंड झाली आहे. प्राध्यापक व तेथे काम करणारे कर्मचारी गायब झाले आहेत. श्यामनगर येथील कार्यालयासमोर फक्त एक शिपाई व सुरक्षा रक्षक यांच्याशिवाय कोणीही दिसत नाही. डॉ शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. त्यामुळे या क्लासेस मध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचारी यांच्यात भिंतीचे वातावरण पसरले आहे.
तगडा बंदोबस्त, बॅनरला काळे फासले
आर सी सी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याची बातमी नांदेड शहरात पसरताच अनेक पालकांची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या नीट पेपर फुटी प्रकरणात डॉ शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. श्यामनगर येथील कार्यालयासमोर डाॅ शिवराज मोटेगावकर यांच्या लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्यामनगर येथील कार्यालयासमोर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस काळजी घेत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List