चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार
आधुनिक केसरी न्यूज
देऊळगाव राजा : घरात घुसून महिलेवर चाकू हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी १२ एप्रिल रोजी देऊळगाव राजा पोलिसांनी एका महिलेसह तिघा विरुद्ध गुन्हा नोंदविला होता. सदर प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली, महिला आरोपीस समन्स पत्र दिले तर एक आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे.
स्थानिक संजय नगर येथील परवीन बी एकबाल खान ही महिला घरात एकटी असताना एका महिलेसह तिघा आरोपींनी तिच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले होते. सदर प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल ओंकार घाटे यास अटक केली. मेघा सतीश घाटे हिस पोलिसांनी समन्स बजावला तर दीड महिना उलटून गेला तरी तिसरा आरोपी तन्मय प्रकाश घाटे हा अद्याप पर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. महिलेवर चाकू हल्ल्या सारख्या गुन्ह्यातील फरार तन्मय याचा पोलीस शोध घेत आहे. सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक व्ही एस पटेल तपास करीत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List