दोन कोटींचा खंडणीसाठी फर्निचर मॉल वर गोळीबार
आधुनिक केसरी न्यूज
गौरव गिरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा खंडणीसाठी गोळीबार केल्याची घटना समोर आली असून, या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करत दहशत निर्माण केली,ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर सोशल मीडियावरून धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे, औंध-रावेत बीआरटी मार्गावर पुनावळे येथे शुक्रवारी दि.15 मे रात्री 9:11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली,
जगदीश भेराराम बिष्णोई (वय 34, रा. पुनावळे, ता. मुळशी, जि. पुणे; मूळ रा. झोटाडा, ता. साचोर, जि. जालोर यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार एका मोबाइल क्रमांकावरून फोन कॉल करणारी व्यक्ती आणि गोळीबार करणारे दोन अनोळखी अशा तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश बिष्णोई यांचा भागीदार अशोककुमार बिष्णोई यांना एका मोबाइल क्रमांकावरून एका संशयिताने फोन केला
दोन कोटी रुपयांची मागणी केली,खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती, परंतु अशोककुमार यांनी खंडणी दिली नाही
शुक्रवारी रात्री फिर्यादी बिष्णोई हे त्यांच्या एजे फर्निचर मॉलच्या बाहेर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी फर्निचर मॉलच्या फलकावर तसेच काचेवर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघे संशयित दुचाकीवरून पसार झाले, अशोककुमार यांनी खंडणी दिली नाही म्हणून फोनवरून खंडणी मागणाऱ्या संशयिताच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे संशयितांनी केलेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला,घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला गोळीबार करणाऱ्या दोघांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू आहे,तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता आणि त्यामागील 'कनेक्शन' ही तपासले जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List