एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 

एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 

आधुनिक केसरी न्यूज 

​नांदेड : नांदेडच्या प्रशासकीय वर्तुळात आज मोठी खळबळ उडाली असून कामात दिरंगाई व कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महानगरपालिकेचे उपअभियंता व महसूल विभागातील महसूल सहाय्यक अशा दोन जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने शहराच्या विकासासाठी '१०० दिवस विशेष कार्यक्रम' हाती घेतला आहे. मात्र, या मोहिमेत कामाची गती राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त  डोईफोडे यांनी वीज विभागाचे उपअभियंता सतीश ढवळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​दुसरीकडे, महसूल विभागातही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. 'आर्थिक दुर्बल घटक' प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत महसूल सहायक माधव फुलवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून देण्यात आला आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गती आवश्यक आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा कडक संदेश या दोन्ही कारवायांच्या माध्यमातून नांदेडकरांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. एकाच दिवशी झालेल्या या दुहेरी कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित  एकाच दिवशी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन; ​मनपाचे उपअभियंता ढवळे व महसूलचे फुलवळे निलंबित 
आधुनिक केसरी न्यूज  ​नांदेड : नांदेडच्या प्रशासकीय वर्तुळात आज मोठी खळबळ उडाली असून कामात दिरंगाई व कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन...
जन्मदाता बापच दोन चिमुकल्यांचा बनला मृत्यूदाता; संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी जुन्नर तालुक्यात घडली घटना
ग्रामीण पोलिसांची बळीरामपुर व गुरुरामदास नगर येथे धाड; ४३ लाख ४८ हजार रुपयांचा ४ हजार ७०० अवैध शस्त्रसाठा जप्त 
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!
लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या