शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू

तिरोडा तालुक्यातील माल्ही बिट परिसरातील घटना

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात उघडकीस आली. सदर वाघ हा चार दिवसांपूर्वीच विहीरीत पडला असावा असा प्राथमीक अंदाज आहे. या घटनेने वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 प्राप्त माहितीनुसार
तिरोडा वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र वडेगाव अंतर्गत गट क्र. २६४ माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जलद बचाव पथक व तिरोडा वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विजय धांडे, नवीन नागझिराचे सहाय्यक वनसंरक्षक मनिषा चव्हाण, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत, टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनीही भेट देऊन पाहणी केली. यावेळी एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, मानद-वन्यजीव रक्षक सावन बहेकार, राजेश भनदिर्गे, एलडीओ प्रविण सोनवाने, मेघराज तुलावी यांच्या उपस्थितीत सदर वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर वाघ हे शिकारीच्या बेताने पाठलाग करीत असताना अचानकपणे कठडे नसलेल्या विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पुढील तपास सहायक वनसंरक्षक विजय धांडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रविकमल भगत करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार