गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 

गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : २६ मार्च येथील केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गत येणार्‍या बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना आज, गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सर्व विद्यार्थीनींना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज असून १८५ निवासी नर्सिंग प्रशिक्षणार्थी आहेत. सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीन मधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. बुधवारी २५ मार्च रोजी रात्री विद्यार्थिनींनी जेवण करुन झोपी गेल्या. यानंतर रात्री दोन तीन विद्यार्थिनींच्या पोटात दुखने सुरू झाले. त्यात उलट्याही होऊ लागल्या. यावेळी त्यांना उपचारासाठी त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्सिंग कॉलेजच्या आणखी काही विद्यार्थिंनींना नेमका हाच त्रास होवू लागला. त्यामुळे या सर्व विद्यार्थिंनींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे, नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्यार्थिंनींनी कॅन्टीनचे जेवण केले. त्यापैकी ४५ विद्यार्थिंनींना त्रास झाला. त्यामुळे नेमके या विद्यार्थिंनींना विषबाधा कशातून झाली हे स्पष्ट झाले नाही. मात्र, बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर हा प्रकार घडल्याने जेवणातून तर विषबाधा झाली नसावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्व ४५ विद्यार्थिंनींवर मेडिकलमध्ये उपचार सुरु असून विद्यार्थिंनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

पाणी आणि अन्नाच्या नमुन्याची तपासणी
३५ विद्यार्थिंनींना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने या विद्यार्थिंनींना विषबाधा झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र ही विषबाधा नेमकी जेवणातून झाली की पाण्यामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध विभागाच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.

 कोट..!
रात्रीपासून ३५ विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. सर्व विद्यार्थीनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून सर्व विद्यार्थिंनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नेमकी कशामुळे विद्यार्थिंनींना विषबाधा झाली याची तपासणी सुरु आहे.
 - पुरुषोत्तम पटले, जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस रुग्णालय, गोंदिया 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू  गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : २६ मार्च येथील केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गत येणार्‍या बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना...
चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण
टू व्हीलर ला आग; तीवडीचे माजी पोलीस पाटील थोडक्यात बचावले.
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे चंद्रपूर महानगरात भव्य रामनवमी शोभायात्रा उत्सव
श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 
जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही
दुसरबीडमध्ये रक्तरंजित संघर्ष; तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर जीवघेणा हल्ला, ५ ते ६ जण गंभीर