टू व्हीलर ला आग; तीवडीचे माजी पोलीस पाटील थोडक्यात बचावले.
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
गौलखेड : टू व्हीलर चालवत असताना अचानक गाडीला आग लागल्याने दुचाकी जळून राख झाली तर दुचाकी वाहन चालकाने प्रसंगाधावन राखत स्वतःचा जीव वाचवण्याची घटणा जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड गावात २६ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. तिवडी येथील माजी पोलीस पाटील विनायकराव पाटील हे आपल्या दुचाकीने गौलखेड गावातून जात असताना त्यांच्या दुचाकीला अचानक आग लागल्याचे नुसताच प्रसंगावधान राखत त्यांनी आपली दुचाकी उभी केली व बाजूला झाले. काही क्षणात दुचाकीची राख झाली. सदर घटना ही गावात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले गाडीला विझवण्याचा प्रयत्नही केला परंतु गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतल्याने काही क्षणात गाडीचे सर्व अवयव जळून राख झाले. नशीब बलवत्तर म्हणून तिवडीच्या माजी पोलीस पाटीलांचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. विनायक पाटील हे तिवडी गावचे पोलीस पाटील राहिलेले असून गौलखेड, दादुलगाव, आंघोळ,मालेगाव या परिसंवादात त्यांचा फार मोठा जनसंपर्क असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अचानकपणे झालेले या घटनेमुळे गावात एकच गडबड उडाली होती. गाडीला आग कशामुळे लागली अद्याप समजू शकले नाही परंतु या दुर्घटनेत विनायक पाटील यांचा थोडक्यात जीव बचावला असून त्यांची दुचाकी आगीत जळून राख झाली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List