श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 

श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 

आधुनिक केसरी न्यूज 

शेगांव दि.२३ श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने श्रीं राम नवमी उत्सवा करिता श्री चे मंदिर दर्शनसाठी दोन दिवस खुले राहणार आहे. यामुळे भाविक भक्तांना श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. श्रीं राम नवमी उत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये राज्यातील भजनी दिंड्या शेगाव येथे दाखल होत आहे भजनी दिंड्यांमधील वारकरी भाविकांनी श्रीच्या समाधी मंदिराचे दर्शनासाठी दि. २५ व २६ मार्च रोजी  श्रींच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहिलं. श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर दि. २५ वार  बुधवार दि.२६ गुरुवार २०२६ रोजी श्री दर्शनार्थ रात्रभर खुले राहील. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन आपल्या गावी परत जाणार आहे  तरी श्रींच्या भावीकभक्तांनी यांचा लाभ घ्यावा.

आज दि.२३ मार्च सोमवार चैत्र शु ५ रोजी श्रीराम नवमी उत्सव निमित्त ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोपचारात अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागास शुभारंभ सकाळी ११ वाजता भक्तिमय वातावरणात करण्यात आला आहे  यागाचे पूजन वेदमूर्ती ब्राह्मण वृंदाद्वारे करण्यात आले आहे. चैत्र शु ९ गुरुवार दि.२६ मार्च श्री राम नवमी दिनी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले  श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 
आधुनिक केसरी न्यूज  शेगांव दि.२३ श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने श्रीं राम नवमी उत्सवा करिता श्री चे मंदिर...
जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही
दुसरबीडमध्ये रक्तरंजित संघर्ष; तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर जीवघेणा हल्ला, ५ ते ६ जण गंभीर
नांदेड महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून गाडीवाले यांची बिनविरोध निवड 
हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू