एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरातील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त सेवकाने व्यकीत देयकापोटी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार १३ मार्च रोजी दुपारी २ वाजता एमजीएम कॉलेजमध्ये घडला.

महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय एअरपोर्ट नजीक आहे. या महाविद्यालयात सेवक पदावरून निवृत्त झालेले सुनील रामकृष्ण कुलकर्णी (वय ६१) हे १३ मार्च रोजी महाविद्यालयात आले. त्यांचे थकीत देयके महाविद्यालय प्रशासन देत नसल्यामुळे ते त्रस्त झाले होते. त्यांनी रागाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळी तेथील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सुनील कुलकर्णी त्यांना त्यापासून मज्जाव केला. परंतु त्यात ते भाजल्या गेले. अधिक उपचारासाठी त्यांना आधार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त सेवकाने व्यकीत देयकापोटी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन...
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा