बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : शहरातील बाफना टी पॉईंट येथील डेंटिंग पेंटिंगच्या दुकानात शनिवारी पहाटे अचानक आग लागली असून या भिषण आगीत दुरुस्तीसाठी आलेली ३ चार चाकी वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने अन्य ४ वाहने आगीमधून सुरक्षित बाहेर काढली आहेत. शहरातील वाफना टी पॉईंट परिसरात वाहने दुरूस्तीची अनेक दुकाने आहेत. यातील डेंटिंग पेंटिंगच्या एका दुकानात शनिवारी पहाटे २.१० च्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळात या आगीने भीषण रुप धारण केले होते. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागास दिली. तेव्हा तत्परता दाखवून अग्निशमन विभागाचे अधिकारी
केरोजी दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने वाहनासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सदरील तिन्ही वाहनांची आग विझवली, मात्र सदर वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये स्कोड, मारुती स्विफ्ट व महिंद्रा एक्स युव्ही, ही वाहने जळाली. तर आगीपासून मर्मा-हंद्रा पिकअप, होंडा सिटी, टाटा इंडिका व महिंद्रा या अन्य ४ वाहनांचा अग्निशमनच्या टिमने आगीपासून वचाव केला, असे दुकान मालक तोफिक पठाण यांनी सांगीतले. दरम्यान आग कशामुळे लागली ते समजू शकले नाही. या कारवाईत अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांवळे, सावळे, लांडगे, नरवाडे, शिंदे वाहन चालक टारपे यांनी सहभाग घेतला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List