दुचाकी वाहन जळून खाक; मार्डा रोडवर कुणबी भवनजवळील घटना
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : तालुक्यातील मार्डा रोडवर कुणबी भवनच्या बाजूने जाणाऱ्या नवीन हायवेजवळ एक भीषण अपघात घडला. वडगाव येथील रहिवासी प्रमोद पिंपळशेंडे यांच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. ही घटना आज दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळशेंडे आपल्या दुचाकीने मार्डा रोडवरून जात असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात दुचाकीला आग लागली. आग एवढी भयानक होती की, चालकाला वाहन थांबवून जीव मुठीत धरून बाजूला पळावे लागले. वाहन विझवण्याचा कोणताही प्रयत्न करण्याआधीच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमी पैकी 12 जणांना चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यापैकी मयूर वनसिंगे 16, राजू किसन शिवरकर 42 वर्ष व राजू जाधव 40 हे गंभीर जखमी आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List