चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी

चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी

आधुनिक केसरी न्यूज
 
चंद्रपूर : शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संगीता महापौर या विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या संगीता महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असूनही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता स्थापनेपासून दूर राहिला.  तर एआयएम  सभागृहात उपस्थित राहूनही मतदानापासून तटस्थ राहिले.वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार या निवडणुकीपासून दूर राहिले. तर, उबाठा गटाने भारतीय जनता पार्टीला साथ देत अखेर महापौर पदावर संगीता खांडेकर यांचा विजय झालेला आहे. निवडणूक झाल्यानंतर तब्बल 26 दिवसानंतर महापौर पदाची निवडणूक पार पाडली. प्रचंड उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणून ठेवलेल्या या महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला असून भारतीय जनता पार्टीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने साथ दिली आणि अखेर चंद्रपूर महानगरपालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या संगीता खांडेकर या महापौर पदावर विराजमान झाल्या आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी  चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. याच्यामध्ये पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव या दोघांनाही...
चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी
अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना
सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..!