माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल

माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी 'एक्स पोस्ट' द्वारे दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
आधुनिक केसरी न्यूज वरोडा : सामान्यांचा कळवळा असणारा माणूस, सामान्यांना आपला वाटणारा, आपल्या घरचा माणूस गेल्याचे दुःख सामान्यांना झाले. अजित...
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी
सुकमा येथे चार नक्षलवाद्यांची शरणागती; दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा