गडचिरोलीच्या विकासाला नवे इंजिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’चे भव्य उद्घाटन
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे.
गडचिरोली : 27 डिसेंबर 2025 “गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून, तो आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था उद्घाटनप्रसंगी गडचिरोलीच्या विकासाचा नवा अध्याय जगासमोर मांडला.
अडपल्ली येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खाजगी भागीदारीत उभारलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीची मागास अशी जुनी ओळख आता पुसली जाणार असून, तंत्रज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या बळावर हा जिल्हा जागतिक नकाशावर आपली ठसा उमटवेल.
विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे दार खुले
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही संस्था तांत्रिक शिक्षणाच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय राज्यमंत्री तसेच गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह विद्यापीठ व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आजचा दिवस इतिहासात कोरला जाणार’ – कुलगुरू डॉ. बोकारे
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, “आजचा दिवस गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. महाराष्ट्रातील कदाचित हे एकमेव विद्यापीठ आहे, ज्याचे स्वतःचे तंत्रज्ञान विद्यापीठ असून येथे अभियांत्रिकी शिक्षण सुरू आहे. 2025 पासून डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू झाला असून, 2026 पासून बी.टेक. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ही संस्था केवळ शिक्षण देणारी नसून, जागतिक दर्जाच्या संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित होईल.” खेळाडूचा गौरव या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थिनी व युथ पॅरा गेम्स – आर्चरी प्रकारात दुबई येथे विजेती ठरलेली श्वेता कोवे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ₹1,11,000 च्या धनादेशाने गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विभागांना भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील गणमान्य नागरिक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List