नव्या वर्षाच्या स्वागता करीता श्रींच्या भाविकांसाठी आनंदाची पर्वणी, ३१डिसेंबरला श्रींचे मंदिर रात्रभर उघडे राहणार
आधुनिक केसरी न्यूज
शेगांव दि.२५ ३१ डिसेंबर रोजी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शेगांव श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर वार बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी श्री दर्शनार्थ रात्रभर खुले राहील. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नविन वर्षाची सुरुवात करणार आहेत
श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा.
गुरुवार व दशमीच्या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघत असते. दि.३० डिसेंबर २०२५ रोजी दशमी असल्याने श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघेल तर दि.३१ डिसेंबर वार बुधवार रोजी पुत्रदा भागवत एकादशी आहे. दि.१ जानेवारी २०२६ रोजी वार गुरुवार आल्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रीच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघणार असल्याने श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींच्या पालखीचे दर्शन मिळणार आहे. एकादशी व गुरुवार या दोन दिवशी राज्यातील हजारो भाविकां शेगांवची वारी करुन धन्य होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List