चंद्रपूर जिल्ह्यात मतदारांनी भाजपला नाकारले काँग्रेसला दिला हात
१० पैकी ७ सात जागी काँग्रेस तर भाजपला केवळ दोन जागा
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला थेट नाकारत काँग्रेसला हात दिलेला आहे. दहा नगरपालिकांपैकी सात नगरपालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले असून भाजपच्या वाट्याला केवळ दोन जागा आलेल्या आहेत. तर एका जागी अपक्षाने बाजी मारली आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजय
वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी
मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी
राजुरा नगराध्यक्ष - काँग्रेसचे अरुण धोटे अरुण धोटे विजयी
गडचांदूर नगराध्यक्ष - अपक्ष उमेदवार निलेश ताजने विजयी
नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी
ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी
चिमूर नगराध्यक्ष : भाजपाच्या लिंगायत मॅडम विजयी
घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के विजयी
बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई विजयी
नगर पंचायत
भिसी नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी
चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत
काँग्रेस : 7
शिंदे सेना : 1
भाजप : 2
अपक्ष : 1
असा निकाल लागलेला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List