"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे

आधुनिक केसरी न्यूज

गोंडवाना : विद्यापीठाचा एक वेगळा नव उपक्रम "विद्यापीठ आपल्या गावात" मा.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या प्रेरणेतून भौगोलिक, सामाजिक, आर्थिक इ. कारणांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम २०२३ मध्ये जांभळी या गावातून सुरुवात झाली. "विद्यापीठ आपल्या गावात" या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी  आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे प्राचार्य डॉ. श्याम खंडारे  आणि विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाचे समन्वयक डॉ. महिंद्र वर्धलवार  यांनी जांभळी या गावाला संध्याकाळी सात वाजता भेट देऊन या नव उपक्रमाचा आढावा घेतला.  याप्रसंगी डॉ.खंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठ आपल्या गावात या कार्यक्रमांतर्गत शिकवीत असलेल्या  बांबू क्राफ्ट, वनउपज, जंगल व्यवस्थापन, आदिवासी व ग्रामीण अर्थव्यवस्था अशा विविध विषयांना नवीन शैक्षणिक धोरणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असून रोजगाराच्या विविध संधी ही उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थी दिवसभर  शेतातले, जंगलातले व इतर विविध कामे करून संध्याकाळी क्लासला येतात या त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना रोजगाराच्या कौशल्यासह बी.ए. ही पदवी प्राप्त होऊन चांगला रोजगार मिळवण्यास विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होईल याची ग्वाही देऊन उद्बोधित केले. याप्रसंगी जांभळी या गावातील विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमा अंतर्गत शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या...
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना