'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा

आधुनिक केसरी

पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली.

पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेकडोंच्या संख्येने शिवभक्त व शंभू भक्त या मोर्चामध्ये सहभागी झाले. 'जय भवानी जय शिवाजी', 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दीपक काटे म्हणाले, "संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे, ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला फाशी देण्याची भाषा करतात. मात्र स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय, याकडे ते दुर्लक्ष करतात. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही, तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत."

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरिष्ठ अधिकारी झोपेत, ग्रामसेवक गायब; वझरगा ग्रामपंचायतीत संतापाचा उद्रेक..! वरिष्ठ अधिकारी झोपेत, ग्रामसेवक गायब; वझरगा ग्रामपंचायतीत संतापाचा उद्रेक..!
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी  देगलूर : वझरगा ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि गतिमान असावा, असा शासनाचा नियम असताना वझरगा येथे...
चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
वर्धा पोलीस मुख्यालयातील 'शस्त्र गोळीबार प्रशिक्षण' यशस्वी; अंमलदार संभाजी मुंढकर यांचा गौरव
टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम