खातेदारांची फसवणूक होऊ नये यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार : मुख्यमंत्री फडणवीस
ज्ञानराधाच्या खातेदारांच्या फसवणुकीबाबत लोणीकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
आधुनिक केसरी
परतुर : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लोकांचे बुडवलेले पैसे परत करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
या उत्तरादरम्यान श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रमाणे इतर कुठलाही सोसायटीच्या वतीने खातेदारांची फसवणूक होऊ नये यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार असल्याची माहिती दिली. या युनिटच्या माध्यमातून अधिकचा व्याजदर कसा दिला जाईल या संदर्भात संबंधित सोसायटीला या युनिटला कळवावे लागणार आहे त्यामुळे त्यांचा अत्याधिक व्याजदर देताना त्यांना कुठल्या माध्यमातून दिला जाणार आहे याबाबतचा खुलासा करणे अपेक्षित असणार आहे.
त्याचबरोबर या घोटाळ्याच्या संदर्भाने सहकार राज्यमंत्री श्री पंकज जी भोयर यांनी देखील मागील आठवड्यात उत्तर दिले होते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री व ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणारे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List