साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद  

साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद  

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : शहरात तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास शिर्डी साकुरी शिव व नादुर्खी रोडवर लुटमारीच्या इराद्याने  साईबाबा संस्थानचे कर्मचारी सुभाष घोडे व नितीन शेजुळ व क्रृष्णा देहरकर  यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्यात दोघांचा मृत्यू झाला होता तर जखमी देहरकर यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे  या घटनेनंतर शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण तयार झाले होते  जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला होता हा गुन्हा  किरण सदाफुले व राजु उर्फ शाक्या माळी राहणार शिर्डी  यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते  पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करुन ३ फेब्रुवारी रोजी  किरण सदाफुले याला  जेरबंद करून गजाआड केले होते मात्र त्याचा दुसरा सहकारी राजु उर्फ शाक्या माळी हा पोलीस पथकाला हुलकावणी देऊन पसार झाला होता तो  शिर्डी सोडून पसार होणार नाही यासाठी विविध पोलीस पथके त्याच्या मागावर होती तो शिर्डी लगत असलेल्या काटवणात लपून बसला असावा असा संशय पोलीसांना असल्याने त्या अनुषंगाने  पोलीस पथके त्याच्या मागावर असताना ४ फेब्रुवारी रोजी ७,३०च्या सुमारास त्यास काटवनात लपून असलेल्या ठिकाणी त्यास पाठलाग करुन जेरबंद करण्यात आल्यानंतर त्यास पोलीसांनी अटक करून चौकशी केली असता  दारुच्या नशेत गुन्हा घडल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांनी पत्रकार परिषदेत दिली   किरण सदाफुले यास राहता न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी देण्यात आली असून आधिक चौकशी नतर बरिच माहिती समोर येणार असून  यात आणखी कोणी सहभागी आहे का शस्त्र कोठे घेतले दुचाकी कोणाची आहे  कोठे नशा केली या बाबत प्रकाश पडणार आहे   घटनेनंतर माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी  लक्ष घालून सर्व आरोपी गजाआड केले  जातील असे आश्वासन मयताच्या  नातेवाईकांना दिले  होते या घटनेनंतर शिर्डी शहरात मोठी घबराट पसरली होती या कारवाईत पोलीस निरीक्षक तुषार धाकराव  रामकृष्ण कुंभार  सपोनि थोरात  एल सी बी चे कर्मचारी इरफान शेख  अशोक शिंदे मनोज गोसावी  दत्ता हेगडे  अमृत आढाव  रमीज राजा अत्तार  गुंजाळ या पोलीसांनी या कारवाईत भाग घेतला

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धरणे आंदोलनासाठी अधिकृत जागा द्या ! जालना येथील अशासकीय संस्थेच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी धरणे आंदोलनासाठी अधिकृत जागा द्या ! जालना येथील अशासकीय संस्थेच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी
आधुनिक केसरी न्यूज जालना : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी अधिकृत व सुरक्षित जागा शासनाने नेमून द्यावी, अशी...
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू भोकर-नांदेड रस्त्यावरील घटणा
विकासकामांच्या जोरावर चंद्रपूर महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुबंईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण  अपघात; सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लागल्या किलोमीटरपर्यंत रांगा
भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी
चंद्रपूर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपामध्ये घमासान तर काँग्रेसमध्ये शीतयुद्धाचे पडसाद,निष्ठावंतांना डावलले,  आयारामांचे  स्वागत